मार्च २४ २०१४ ची ती संध्याकाळ.. संकष्टी चतुर्थी पाहून आम्ही सिझरिन करायचं ठरवलं आणि आमच्या (माझ्या आणि मीनलच्या ) आयुष्यात ओम आला.
ओम आता ३.५ वर्षाचा झाला आहे. तर त्याच्या गमती जमती पाहण्यात एकंदरीत वेळ कसा जातोय कळत नाही .
तर मी विचार केला कि ओमच्या आतापर्यंतच्या गमती जमती आणि किस्से या व्यासपीठावर / ब्लॉग वर नोंदवून घेऊ . भविष्याचा वेध घेताना बर्याचशा गोष्टी आपण अनावधानाने म्हणा किंवा अनुभवाने , आपण विसरतो . हा एक प्रयत्न म्हणून मी ओम च्या बाललीला इथे लिहीत आहे .
१.
सकाळची वेळ. ओम अंगणात माझ्यासोबत बॉल खेळत होता. आमच्या गल्लीतला एक जिमी नावाचा अल्सेशिअन कुत्रा gate जवळ आला आणि साहेबांची धांदल उडाली. मी ओमला शांत केलं आणि बॉल खेळणं चालू ठेवलं. अचानक गफलत झाली आणि बॉल बाहेर गेला. जिमीने बॉल तोंडात पकडून ठेवला. मी gate च्या बाहेर गेलो आणि जिमिच्या तोंडातून बॉल काढत होतो . इकडे ओम नि आतमध्ये एका सुरात रडणं चालू केलं . रडणं काही केल्या थांबेच ना. मीनल , बाबा सर्वांनी प्रयत्न केले. पण ओम काही केल्या रडणं थांबवत नव्हता . मी बॉल घेऊन आत मध्ये आलो आणि gate बंद केलं तेव्हा स्वारी शांत झाली.
आम्ही त्याला सहज विचारला कि तू का रडत होता तर ओम म्हणाला "नाही सांगू शकत". २. ५ वर्षांच्या ओम कडून हे असं ऐकताना खरंच मजा आली
२.
ओम सोबत नोव्हेंबर २०१७ मध्ये इमॅजिका वॉटर पार्क ला जायचा योग आला . तिथे लोकांना पाण्यात खेळताना पाहून ओम म्हणाला "किती पाणी वेस्ट करत आहेत हे लोकं " . मला फडताळात लपलेल्या नारायणाची आठवण झाली "करितो चिंता विश्वाची "