Written on the occasion of Post-retirement party of My mother(7th March 2020)
हॅलो आई म्हणतांना आज जरा निवांत वाटतंय ..
ऑफिसची लगबग नसणार , साहेबांची नसणार...
डब्बा -स्वयंपाक आणि कूकरचा आवाज आता कुठे शांत वाटतोय ..

हॅलो आई म्हणतांना आज कसं वेगळं वाटतंय ..
शाळा ऑफिस घर कॉलेज .. आईसोबत केलेले सगळेच प्रवास ..
आई सोबत असलेले रुसवे फुगवे .. आज सगळं म्हणजे सगळं आठवतंय ..

हॅलो आई म्हणतांना काय सांगू आज काय वाटतंय ..
व्हाट्सएप्प , एफबी वर डीपी change करणारी आई ..
iphone मिरवणारी आमची अपडेटेड आई ..
तिच्याच शब्दात सांगायचं तर .. दुधावरची जणू साय वाटतेय ..

हॅलो आई म्हणतांना आज अगदी छान वाटतंय ..
निवृत्त झाली तरी , आपल्या पार्टी करता टाप -टीप तयार झालेली आई ..
ओम-कवीन सोबत खेळतांना ..मनानं मोठी आणि वयानं जरा लहान वाटतेय

No comments:
Post a Comment